महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभुषण जाधव यांच्या सुटकेसाठी आज नागपूर येथे प्रांताध्यक्ष श्री अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री श्री विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.
मोहिमेत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री अतुल कोटेचा, श्री उमाकांत अग्निहोत्री, ऍड. अभिजित वंजारी, नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता श्री संजय महाकाळकर, श्री विशाल मुत्तेमवार तसेच शहर काँग्रेस चे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी करून त्यांचा पाठिंबा दर्शविला व भावना व्यक्त केल्या.



No comments:
Post a Comment