Tuesday, April 18, 2017

आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खा. अशोक चव्हाण

आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही
संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खा. अशोक चव्हाण
नामपूर/सटाणा, नाशिक दि. १७ एप्रिल २०१७
आमच्या सर्वांची आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शेतक-यांना केले आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांची संयुक्त संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात पोहोचली. नामपूर बाजार समिती मैदानावर विराट सभेला संबोधित करताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र सरकारची संवेदनशीलता संपली आहे. आई वडिलांकडे लग्नासाठी पैसे नसल्याने उपवर मुली आत्महत्या करू लागल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नसल्याने राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे पण सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाचा अभ्यास करावा लागतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरु झालेला हा संघर्ष कर्जमाफी मिळेपर्यंत थांबणार नसून सरकारला संपूर्ण कर्जमाफी द्यावीच लागेल असे खा. चव्हाण म्हणाले.
याच सभेत बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, खासदारांच्या विमान प्रवासासाठी मंत्र्यांची कॉलर पकडणारे शिवसेना नेते कर्जमाफीच्या मुद्द्यावर का गप्प आहेत? ही लढाई शेतक-यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय थांबणार नाही. आगामी काळात रस्त्यावर उतरून सरकार विरोधातील लढा आणखी तीव्र करू असा इशारा विखे पाटील यांनी सरकारला दिला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप सरकाच्या कामावर कुठलाही वर्ग समाधानी नाही. शेतकरी मेटाकुटीला आला असून कांदा, कापूस, सोयबीन, द्राक्षे कुठल्याही शेतमालाला भाव नाही. शेतक-यांच्या संस्थांवर बगलबच्चे बसवून संस्था गिळंकृत करण्याचा भाजपचा डाव असून यांना वेळीच रोखण्याची गरज असून त्यासाठी कर्जमाफी होईपर्यंत मंत्र्यांना गावबंदी करा असे आवाहन पवार यांनी उपस्थित शेतक-यांना केले.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु आझमी शेकाप नेते प्रवीण गायकवाड यांनीही सरकारवर सडकून टीका करत कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.. 
तत्पूर्वी नाशिकच्या मालेगाव येथे संघर्ष यात्रेचे स्वागत व जाहीर सभा झाली. त्यांनंतर प्रमुख नेत्यांनी मालेगाव तालुक्यातील वाके येथील आत्महत्या केलेल्या २५ वर्षीय तरुण शेतकरी मनोज सावंत याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, आ. भाई जगताप, आ.पंकज भुजबळ, आ. गोपालदास अग्रवाल, आ. डी. पी. सावंत, आ. अमर राजूरकर, आ. वसंत चव्हाण, आ. सुधीर तांबे, आ. प्रदीप नाईक, आ. चंद्रकांत रघुवंशी आ.दिपिका चव्हाण, आ. विद्या चव्हाण, आ. यशोमती ठाकूर, पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी, शेकापचे प्रविण गायकवाड, संघर्ष यात्रेचे समन्वयक आ. जितेंद्र आव्हाड आणि आ. सुनिल केदार यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
संघर्ष यात्रेने बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याचा प्रवास केला सर्व ठिकाणी शेतक-यांनी मोठ्या उत्साहात संघर्ष यात्रेचे स्वागत केले. उद्या शहापूर येथे संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याचा समारोप होणार आहे
Image may contain: 1 person, closeup

लातूर महानगरपालिका निवडणूक : 2017

लातूर महानगरपालिका निवडणूक : 2017
आज काँग्रेसच्या झंजावती रॅलीस लातूरकरांचा जोरदार प्रतिसाद. लातूरच्या युवक ,महिलांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला.
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर टिपेला असून कोंग्रेस ने प्रचारात मुसंडी मारली आहे . आज लातूरचे सुपुत्र रितेश विलासराव देशमुख यांच्या ऱॅलीच्या उत्स्फुर्त प्रतिसादाने प्रचार वेगळया उंचीवर नेण्यात लातूर कोंग्रेस ला यश आले आहे.
रॅलीस महिला ,युवक यांचा प्रतिसाद प्रचंड होता .शिवाजी चौक - खोरी गल्ली ते सुभाष चौक अश्या ५ किलोमीटर ऱॅलीस झालेल्या गर्दीमुळे कोंग्रेस आणी विरोधकातील अंतर स्पष्ट झाले आहे .
विजयाच्या निर्धाराने सुत्रबद्ध प्रचारयंत्रणा राबवन्यात आलेले यश कोंग्रेसच्या महापालिकेतील विजयाचे दरवाजे प्रशस्त करणारे आहे.Image may contain: 4 people, people standing and outdoorImage may contain: 1 person, crowd and outdoor

महाराष्ट्राचे सुपुत्र श्री कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानात सुटका व्हावी यासाठी रस्ते रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला.

आज नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अशोकराव चव्हाण , अमर राजुरकर व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी किशोर स्वामी , डॉ. दिनेश निखाते, अमितकुमार काबरा , रमेश गोडबोले , संदिप सोनकांबळे , विलास परिहार वारकरी तुकोबाचा धबाले, विठ्ठल पावडे व सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे सुपुत्र श्री कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानात सुटका व्हावी यासाठी रस्ते रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला.
Image may contain: 10 people, outdoor
Image may contain: 1 person, outdoor

संघर्षयात्रा धुळे

संघर्षयात्रा धुळे
अशोक चव्हाण भाषण
धुळे शहरामध्ये संघर्ष यात्रेला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धुळेकरांचे धन्यवाद..
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व पक्ष एकजूट झालो आहोत..
आम्ही एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात परिवर्तन होऊ शकत नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत आम्ही माघार घेणार नाही.
दोन वर्षांत ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. घरातल्या मुली बाळींना आत्महत्या करावी लागते. यापेक्षा दु:खद गोष्ट आहे.
उप्रमध्ये निवडणूक होती म्हणून कर्जमाफी झाली. महाराष्ट्रात हा मुहूर्त २०१९ च्या निवडणुकीत येईल. आमचे सरकार असताना २००७ साली कर्जमाफी केली होती. त्यासाठी आम्ही मुहूर्त काढला नव्हता.
छत्रपतींचे नाव घ्यायचा यांना नैतिक अधिकार नाही. पुण्यतिथीला नतमस्तक होण्याएवजी सत्तेची मस्ती इतकी झाली की यांनी ढोल बडवले. कधी काय करावं काहीच कळत नाही.
महाराष्ट्राचा सुपूत्र पाकिस्तानात फासावर जात असेल तर तुमच्या ५६ इंच छातीचा काय उपयोग. कूलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी पाकिस्तानात का जात नाही वाढदिवसाचे केक खायला पाकिस्तानात जाता आता कुलभूषण जाधव यांना वाचविण्यासाठी पाकिस्तानात जा नाहीतर काहीही करा पण वाचवा
२२ मार्च ला पिक विम्याचे पैसे कर्जापोटी काढून घेण्याचा निर्णय घेतला होता.. आम्ही सरकारवर दबाव टाकल्यामुळेच हा आदेश मागे घेतला. हे आपलेपहिले यश आहे. पण आपला लढा संपूर्ण कर्ज माफ करेपर्यंत थांबवायचा नाही.
कर्जमाफी न करता आम्ही पुर्नगठण करु असे सांगितले गेले पण अजूनही पुर्नगठण झालेले नाही. पाणी आणि इतर समस्या सुटलेल्या नाहीत.
एकही भूल कमल का फूल असं आता व्यापारी वर्ग बोलू लागला आहे. केंद्रात नरेंद्र आणि देशात दारिद्र्य अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे.
#EVM मशीनमध्ये काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न आता गावोगावी विचारला जात आहे.मतदान मशीन मध्ये घोळ वाढत असल्याने निवडणूक आयोग,कोर्टात तक्रारी गेल्या आहेत...
मुलींना आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे...
गावांमध्ये वीज खंडित होणे,पाणी पुरवठा नाही...
सरकारच्या योजना केवळ कागदावरच...
सभेला पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी,शेकापचे नेते प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ. जितेंद्र आव्हाड, आ.राजेश टोपे, आ.अब्दुल सत्तार, आ सुनील केदार, आ. सुमन पाटील, आ.दिपिका चव्हाण, आ. विद्याताई चव्हाण, आ. भाई जगताप, डी. पी सावंत, अमर राजूरकर, आ.यशोमती ठाकूर, आ.प्रदीप नाईक , आ. हर्षवर्धन सपकाळ.जयकुमार गोरे, आ. आ. हनुमंत डोळस आ.प्रकाश गजभिये, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Image may contain: 10 people, people smiling, people standingImage may contain: 15 people, crowd

#संघर्षयात्रा

#संघर्षयात्रा 
करवंद नाका शिरपूर, जिल्हा धुळे येथील जाहीर सभा.
#Sangharshyatra
Image may contain: one or more people and crowdImage may contain: 1 person

भिसे वाघोली (ता. जि. लातूर) येथील रहिवासी कु.शितल व्यंकट वायाळ हिने स्वतःच्या लग्नासाठी वडीलांकडे पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली.

भिसे वाघोली (ता. जि. लातूर) येथील रहिवासी कु.शितल व्यंकट वायाळ हिने स्वतःच्या लग्नासाठी वडीलांकडे पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली.
तीच्या कुटुंबियांना भेटून माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सांत्वन केले व काँग्रेस पक्षा तर्फे 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली, तसेच आपल्या कुटुंबाच्या व महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत असा धीर दिला.
यावेळी आ. त्रिंबक नाना भिसे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जि. प.सदस्य धीरज देशमुख, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रदेश सचिव अमर खानापुरे, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव बेद्रे इत्यादी उपस्थित होते.
Image may contain: 2 people, people sitting and indoor

मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला‘जय महाराष्ट्र’ केला!

मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला‘जय महाराष्ट्र’ केला!
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा घणाघात
राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळावरून संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ
सिंदखेड राजा, दि. 15 एप्रिल 2017:
शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेने दाखविलेला कळवळा शेवटी ढोंगी सिद्ध झाला आहे. कर्जमाफी मिळेस्तोवर शिवसेना एनडीएच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याऐवजी उद्धव ठाकरे पंतप्रधानांसोबत स्नेहभोजन घेताना दिसून आल्याने मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला‘जय महाराष्ट्र’ केल्याचे दिसून येते, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांनी काढलेल्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना ते बोलत होते. दुसऱ्या संघर्ष यात्रेची सुरूवात होण्यापूर्वी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी राजमाता जिजाबाईंच्या जन्मस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर नजीकच्या एका मैदानावर शेतकऱ्यांच्या विशाल समुदायाला संबोधित करताना विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री आ. जयंत पाटील, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी आदी उपस्थित होते.
रयतेचे कल्याण हेच पहिले कर्तव्य, असे संस्कार देऊन शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊंना वंदन करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणाची सुरूवात केली. त्यानंतर अनेक ताज्या घटना व घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी पित्याकडे लग्नाला पैसा नाहीत म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसे वाघोली या गावातील 21 वर्षीय तरूणीने आत्महत्या करण्याच्या घटनेसाठी त्यांनी सरकारला जाब विचारला. रोज 9-10 शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यांची मुले-बाळेही विहिरीत उड्या घेत आहेत. तरीही राज्याच्या मुर्दाड सरकारला जाग येत नाही, या इतके दुसरे दुर्दैव काय असू शकते? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली.
भाजप-शिवसेनेने सरकारने प्रत्येक कामाचा इव्हेंट केला आहे. सरकारचे निर्णय, घोषणा, कारभार आदी सर्व बाबी इव्हेंट मॅनेजमेंटने सुरू आहेत. भाजपचा सहकारी असलेल्या शिवसेनेने तर आपल्या विदुषकी चाळ्यांनी राज्याचे मनोरंजन सुरू केले आहे. कधी ते कर्जमाफीच्या मुद्यावर बहिष्कार टाकतात, मध्येच दिल्लीला जाऊन जेटलींना भेटून येतात, नंतर अर्थसंकल्पाच्या कामकाजात सहभागी होतात, कर्जमाफी विसरून मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये मश्गूल होतात, नंतर पुन्हा मंत्र्यांना घाबरून फेरबदल थांबवतात, पंतप्रधानांसोबत बैठकीसाठी दिल्लीला जातात, कधी मोदींना शिव्या देतात तर कधी ‘मेरे नरेंद्र भाई’ म्हणत त्यांच्याशी भाऊबंदकी जोडतात. अशी परस्परविरोधी भूमिका घेत शिवसेनेने महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमालाही मनोरंजनात मागे टाकल्याची बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.
गेल्याच आठवड्यात अभिनयाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. ती बातमी वाचून मला वाटले की,भाजप आणि शिवसेनेने भांडणाची जी नौटंकी केली होती, शेतकरी आणि सर्वसामान्यांप्रती कमालीचा कळवळा असल्याचा जो अभिनय केला होता, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना उत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारच दिला पाहिजे, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
मुंबई महापालिकेतील दोन्ही पक्षांनी एकमेकांची औकात काढली. गावगुंड देतात तशा पाहून घेण्याच्या धमक्या दिल्या. पुढे काय झाले?कर्जमाफीसाठी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. मुंबईचे महापौर पद मिळाले अन् राजीनामे कचऱ्याच्या पेटीत गेले.आपल्या खासदाराला विमानात बसता यावे म्हणून शिवसेनेने संसदेत गोंधळ घातला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपच्या विमान वाहतूक मंत्र्याची कॉलर पकडल्याचे वर्तमानपत्रात छापून आले. पण् याच शिवसेनेने कर्जमाफीसंदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या विरोधात केंद्रातील अर्थमंत्र्यांची किंवा कृषिमंत्र्यांची कॉलर पकडल्याचे कोणी कधी ऐकले आहे का?
राज्यभरात सध्या कर्जमाफीचा, शेतमालाच्या भावाचा, खरेदी केंद्रांचा प्रश्न पेटला आहे. पण् युती सरकारची जनतेत जाऊन बोलायची हिंमत राहिलेली नाही. हे फक्त टीव्हीवरून ‘मन की बात’ करतात. आता मुख्यमंत्र्यांनीही ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ म्हणून कार्यक्रम सुरू केला आहे. या नौटंकीबाज सरकारने इव्हेंट बंद करून रयतेचे कल्याण, शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून राज्य कारभार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श स्वीकारला पाहिजे. अन्यथा शेतकरी तुम्हाला माफ करणार नाहीत, असा सज्जड इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
दरम्यान, सिंदखेड राजावरून बुलडाणाकडे जाताना चिखली येथे शेतकऱ्यांनी संघर्ष यात्रेचे प्रचंड मोठे स्वागत केले. तब्बल हजार बाइकस्वारांनी प्रमुख नेत्यांसह शहरातून रॅली काढली. यावेळी संघर्ष यात्रेतील सर्व नेते व आमदार ट्रॅक्टर-ट्रॉलीवर आरूढ झाले होते. बुलडाणा येथेही शेतकऱ्यांची विशाल सभा झाली. मुख्य रस्त्यापासून सभास्थळापर्यंत सर्व नेते बैलगाडीवर बसून गेले.
Image may contain: one or more people, crowd, sky and outdoorImage may contain: 5 people, wedding
Image may contain: 5 people, people standing, tree and outdoorImage may contain: 5 people, people sitting